बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनसामान्यांची लोकल सेवा सुरू करण्याबाबत भाजप मैदानात, मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन

मुंबई | मुंबईतील सामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या विविध भागात आंदोलन केलं. तसेच याबाबतीत अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकल सुरू करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.

मुंबईतील नोकरदारांची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा सामान्य नागरिकांसाठी बंद होती. त्यामुळे मुंबईतील सामान्य नागरिकांची खुपच धावपळ होत होती. त्याचाच धागा पकडत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबईतील आणि ठाण्यांच्या काही रेल्वेस्थानकावर आंदोलन केलं.

ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. यासाठी चर्चगेट स्टेशन बाहेर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवलीमध्ये माेठ्या संख्येने घोषणाबाजी देत आंदोलन केलं. सायनमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार कालिदास कोळंबकर आणि आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांनीही आंदोलन केलं.

दरम्यान, लसीचे दोन डोस ज्या नागरिकांनी घेतले आहेत त्यांच्यासाठी लोकल प्रवास सेवा सुरू करावी, ही आमची जुनी मागणी आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, तर न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी सरकारला जाग येईल का?, असा प्रश्न दरेकर यांनी केला.

थोडक्यात बातम्या-

“मोदींचं क्रीडा क्षेत्रातील योगदान काय?, अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचंच नाव द्या”

“खेळाडूंच्या सन्मानामध्ये राजकीय डावपेच का? अहमदाबाद स्टेडिअमला दिलेलं मोदींचं नाव हटवा”

‘हिंदू खतरे में है’; भाजप आमदाराचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

हिंगोली जिल्ह्यातील दौऱ्यावर राज्यपालांच्या गाडीच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात

आयपीएलआधी बंगळुरूला मोठा धक्का; विराट कोहलीने ‘या’ खास खेळाडूसाठी ठेवले 28 कोटी, पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More