Top News शिक्षण

‘शाळा सुरु करा, आमचं नुकसान होतंय’; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज

मुंबई | कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र लवकरात लवकर शाळा सुरु असा धमकीचा मेसेज एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये देखील शाळा अजून सुरु करण्यात आल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीचा मेसेज करण्यात आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांनी मेसेज करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केलीये.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 क्रमांकावर हा मेसेज आला. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना शाळा आणि महाविद्यालयं अद्याप सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान यावरुन धमकीचा मेसेज करण्यात आलेला. हा मेसेज आग्र्याहून आल्याचं समोर आल्यावर पोलिसांनी तातडीने धाव घेत विद्यार्थ्याला पकडलं.

चौकशीअंती शाळा बंद असल्यानं आमचं नुकसान होतंय, त्यामुळे मी मेसेज केला असल्याचं, त्याने सांगितलं. मोबाइल आणि सीमकार्ड जप्त करुन या विद्यार्थ्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलीये.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे विनंती

‘आम्ही स्वप्न बघत नाही, थेट कृती करतो’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला- मुख्यमंत्री

अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या