बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुरू करा हा व्यवसाय अन् महिन्याला कमवा 3 लाख रूपये

नवी दिल्ली | स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एक असा व्यवसाय आहे जो तुम्ही कमी भांडवलातही सुरू करू शकता आणि दरमहा चांगले पैसे देखील कमावू शकता. शिवाय सरकारदेखील या व्यवसायासाठी मदत करतं.

कृषी क्षेत्राशी निगडीत असलेला हा व्यवसाय आहे मोत्यांचा. मोत्यांची शेती करून अनेक जणांना लाखोंचा फायदा झाला आहे. मोत्यांची शेती करायची असेल तर यासाठी एक तलाव, शिंपले आणि प्रशिक्षण या तीन गोष्टींची गरज आहे.

मोत्यांच्या शेतीसाठी तुम्ही स्वखर्चाने तलाव खोदू शकता किंवा सरकारही या व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान देते. देशातील अनेक भागात शिंपले आढळतात. शिवाय, मध्य प्रदेशातील होशंगाबादसह मुंबईतही या शेतीबाबतचं प्रशिक्षण घेता येतं.

दरम्यान, एक शिंपला तयार करण्यासाठी 25 ते 30 रूपये खर्च येतो. एका शिंपल्यातून 2 मोती निघतात. त्यातला एक मोती साधारण 120 रूपयांना विकला जातो. मोत्यांची व्यवस्थित शेती केली तर वर्षाला सहज 30 लाख रूपये कमावता येतात.

थोडक्यात बातम्या-

येत्या काही तासात ‘या’ भागात पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

“शरद पवारांना 2024ला सर्वात मोठी भेट द्यायचीये, कामाला लागा”

“हे पाकिस्तानी समर्थकांचे मंत्रिमंडळ, असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही”

“मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजीराजे यांचं उपोषण सोडवावं”

फोन टॅपिंग प्रकरणात गृहमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More