उद्योग सुरू करताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा

Startup | सध्या अनेकजण नोकरी (Job) सोडून स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टार्टअप सुरू करणे आव्हानात्मक (Challenging) असले तरी योग्य नियोजन (Planning) व कष्टाच्या (Hard Work) जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

असे उतरा बाजारात (Market)

वेगळेपण (Uniqueness): स्टार्टअप तयार करताना त्याचे वेगळेपण कायम जाणवायला हवे, याचा विचार करा.
ग्राहकांसाठी (Customers) सोपे (Easy) आणि परवडणारे (Affordable): विशिष्ट सेवा (Service) किंवा उत्पादन (Product) ग्राहकांसाठी सोपे, परवडणारे कसे बनवता येईल? याचा विचार करून स्टार्टअप सुरू करा.
कल्पनेची मागणी (Demand): तुमच्या कल्पनेची (Idea) बाजारात मागणी आहे का, याचा अभ्यास (Study) करा.
स्पर्धकांचा (Competitors) अभ्यास: तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि त्यांच्याकडे काय वैशिष्ट्ये (Specialities) आहेत, हे समजून घ्या.
व्यवसायाचे (Business) मॉडेल (Model) ठरवा

तुम्ही काय विकणार आहात?, उत्पन्न (Revenue) कुठून येणार आहे?, तुमचे टार्गेट ऑडियन्स (Target Audience) कोण आहेत?, उत्पादनाची जाहिरात (Advertisement) कशी करणार?, याचा प्रारंभीच (Initially) विचार करा. तुमचे उत्पादन किंवा सेवा सुरुवातीला फक्त प्राथमिक स्वरूपात (Primary Form) बाजारात येऊ द्या, त्यानंतर ग्राहकांच्या प्रतिसादावर (Customer Feedback) त्यात बदल करा.

आर्थिक नियोजन (Financial Planning) करा

सुरुवातीचे भांडवल (Initial Capital) स्वतःच्या बचतीतून (Savings) उभे करा. यानंतर गुंतवणूकदार (Investors) शोधा. केंद्र सरकारच्या (Central Government) ‘स्टार्टअप इंडिया’ (Startup India), ‘मुद्रा लोन’ (Mudra Loan) अशा अनेक योजना आहेत. त्या योजनांचा फायदा घ्या.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .