बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन्यथा रस्त्यावर उतरू’; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

मुंबई | आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी कुलाबा कफ परेड येथे जाऊन शिवस्मारकाच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी त्या कार्यालयाची अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुलब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिस गळत असून त्याची खूप दूरदशा झाली आहे. यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारला इशारा दिला आहे. शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असं ते म्हणाले आहेत. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचा आरोपही मेटेंनी केला आहे.

हे कार्यालय सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विभागाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांचच या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या दीड वर्षात आघाडी सरकारचा एकही नेता या ऑफिसची पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. ऑफिसला गळती लागली आहे. पडझड सुरू आहे. कार्यालयात काहीच शिल्लक राहिलेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच कार्यालयाप्रमाणेच शिवस्मारकाकडेही उद्धव ठाकरे यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी गड-किल्ल्यांची माहिती मागवण्याचे काम सुरू केलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतू स्मारकासाठी काहीच हालचाल सरकारकडून झालेली नसल्याचं पाहायला मिळतं आहे. या सरकारला केवळ मते हवी आहेत. त्यांना स्मारकाच्या कामाचं काहीही पडलेलं नसल्याचंही मेटे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ज्याची भीती होती तेच झालं! भारत-न्युझीलंड अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा खोळंबा

राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल”

बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More