बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणसातला देव! रोज 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवण्यासा सुरूवात

नवी दिल्ली | कोरोनाने देशभरात पुन्हा एकदा तांडव घालण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे बेडची कमतरता आहे तर ऑक्सिजनही मिळताना दिसत नाही. आव वासून उभा असलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. मात्र रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे अनेक राज्य केंद्राकडे मदत मागत आहेत. अशातच  टाटा स्टीलने  ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू, असं ट्विट करत टाटा स्टीलने याबाबत माहिती दिली आहे.

केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारने 50 हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे. या वृत्ताला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी 100 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त, रायगड आणि ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल, असं एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

जेसीबीचा दात मानेत घुसला आणि… काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

ब्ल्यू फिल्मसारखं कर नाहीतर… पत्नीने पोलिसांना सांगितला धक्कादायक प्रकार

‘देवेंद्र फडणवीसांना अटक करा’; रुपाली चाकणकरांची मागणी

पुण्यात नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

“बनावट रेमडेसिवीर प्रकरणात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता”; भाजप आमदाराच्या ट्विटनं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More