बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आजही हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. महाराष्ट्राने केंद्र सरकारचा कृषी कायदा राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शेतीवर कायदा करताना अनेक राज्यांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता आता राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी नवीन कृषी सुधारणा विधेयकासंदर्भात माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

बुधवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन कृषी सुधारणा विधेयकासंदर्भात शरद पवार यांच्याशी विस्तृत चर्चा केली आहे. त्यावर शरद पवारांनी काही सुचना केल्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

कृषि प्रक्रिया व मालाची विक्री, मुल्यसाखळीच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यात कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं होतं. कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला होता.

दरम्यान, नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी लढणाऱ्या 500 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अद्यापही कायदा रद्द करण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस पेटत आहे.

थोडक्यात बातम्या-

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खेडेकर यांचं निधन

संतापजनक! इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास, इन्स्टाग्रामविरूद्ध तक्रार दाखल

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त ‘एवढ्या’ दिवसांत तब्बल 53 हजार रूग्ण कोरोनामुक्त

‘मुंबई पुण्याला तिसऱ्या लाटेचा धोका नाही’; तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण

डाळिंब निर्यातीवर लॉकडाऊनची कुऱ्हाड; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More