बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारावीच्या परिक्षेसंदर्भात ‘या’ राज्यानं केली मोठी घोषणा; विद्यार्थी घरबसल्या देणार पेपर

रायपूर | कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी सरकरानं परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखत सगळे नियम पाळून परीक्षा कशा घेतल्या जातील याबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार विचार करत आहेत. अशातच छत्तीसगड राज्यानं बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी परीक्षा घेण्याचा अजबगजब पॅटर्न जारी केला आहे. छत्तीसगडमध्ये 1 जून ते 5 जून दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्याचं निश्चित केलं आहे. याबाबतचं प्रसिद्धी पत्रकही बोर्डाकडून जारी करण्यात आलं आहे.

छत्तीसगडमध्ये 1 जूनपासून विद्यार्थी बारावीच्या परीक्षा घरीबसून ऑफलाइन पद्धतीनं देणार आहे. यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विद्यार्थी घरी बसून पेपर देणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना पहिले परिक्षा केंद्रावर जाऊन प्रश्नपत्रीका आणि उत्तरपत्रिका घेऊन येणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सगळ्या प्रश्नपत्रीका आणि उत्तरपत्रिका एकाच वेळी देण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 5 जूनपर्यंत बोर्डाद्वारे दिलेल्या उत्तरपत्रिकेत प्रश्नांची उत्तर लिहून पेपर सोडवणं अपेक्षित आहे. सर्व विषयांचे पेपर सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांनी 6 जूनला सगळ्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावर जमा करणं आवश्यक आहे.

बोर्डानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, उत्तरपत्रिका ऑनलाईन, स्पीड पोस्ट किंवा कुरिअरद्वारे जमा करता येणार नाहीत. विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत सर्व उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावर जाऊन जमा कराव्या लागतील. जर एखाद्या विद्यार्थ्याला ठरलेल्या तारखेला उत्तरपत्रिका जमा करता आल्या नाहीत. तर, संबंधित विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर मानला जाईल. त्याचबरोबर उत्तरपत्रिका जमा करताना विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका जमा करताना विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. छत्तीसगड सरकारच्या या अजब परीक्षा पॅटर्नबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थितीत केले आहेत.

थोडक्यात बातम्या –

26 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू; अरविंद केजरीवालांनी घरी जाऊन केलं कुटुंबियांचं सांत्वन

‘तिसऱ्या लाटेची भिती बाळगू नका’; बालरोगतज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’ या वक्तव्याशी आमचा संबंध नाही; सीरमचं स्पष्टीकरण

घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं; धक्कादायक कारण आलं समोर

पदोन्नतीच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारमध्ये ठिणगी; ‘या’ काँग्रेस मंत्र्याचा ठाकरे सरकारला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More