तंत्रज्ञान

SBI चं जुनं डेबिट कार्ड 31 डिसेंबरपूर्वी बंद होणार; जाणून घ्या अधिक माहिती

मुंबई | भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही मॅग्नेटिक स्ट्राईपचे एटीएम कार्ड वापरत असाल तर एटीएम कार्ड बदलून घ्या. नव्या एटीएम कार्डमध्ये सेफ ईएमव्ही चीप देण्यात आली आहे.

कार्ड बदलून घेण्यासाठी बँकेने ग्राहकांना 31 डिसेंबर 2019 पर्यंतची मुदत  दिली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सुचनेनुसार SBI ने आपले सर्व मॅग्नेटिक स्ट्राईपचे कार्ड ईएमव्ही चीप आणि पिन बेस कार्डमध्ये बदलून घेतले आहेत.

मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट कार्डला सेफ ईएमव्ही चीप कार्ड आणि पिन बेस SBI कार्ड घेण्यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या SBI शाखेत अर्ज करावा, असं ट्विट बँकेने केलं आहे.

दरम्यान, एटीएम आणि स्वाईप मशीनच्या माध्यमातून कार्ड क्लोनिंगच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आरबीआयने मॅग्नेटिक कार्ड ईएमव्ही चीपमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या