SBI Loan l रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India – RBI) रेपो दरात (Repo Rate) 25 बेसिस पॉइंट्सने (Basis Points) कपात केल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India – SBI) काही कर्जांवरील व्याजदरात कपात केली आहे.
एसबीआयने (SBI) नवीन रिटेल (Retail) आणि व्यवसाय कर्जांवरील (Business Loan) व्याजदर कमी केले आहेत. ही कर्जे एक्सटर्नल बेंचमार्क रेटशी (External Benchmark Rate – EBR) जोडलेली आहेत, ज्यामुळे घर खरेदी करणे आता अधिक सोपे झाले आहे.
गृहकर्जाचे नवीन दर :
सध्या गृहकर्ज (EBR) 8.9% आहे, ज्यात RBI चा रेपो दर 6.25% आणि 2.65% चा स्प्रेड (Spread) समाविष्ट आहे.
गृहकर्ज: 8.25% ते 9.2% (क्रेडिट स्कोअरनुसार)
होम लोन मॅक्सगेन (ओव्हरड्राफ्ट): 8.45% ते 9.4%
टॉप-अप लोन: 8.55% ते 11.05%
टॉप-अप (ओव्हरड्राफ्ट) लोन: 8.75% ते 9.7%
प्रॉपर्टी तारण कर्ज: 9.75% ते 11.05%
वरिष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज लोन (Reverse Mortgage Loan): 11.3%
YONO इंस्टा होम टॉप-अप लोन: 9.1%
SBI Loan l वाहन कर्ज आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष सवलत :
एसबीआयच्या (SBI) वाहन कर्ज योजना 1 वर्षाच्या एमसीएलआरशी (MCLR) जोडलेल्या आहेत, जो सध्या 9% आहे.
स्टँडर्ड कार लोन, एनआरआय (NRI) कार लोन, एश्योर्ड कार लोन: 9.2% ते 10.15%
लॉयल्टी कार लोन: 9.15% ते 10.1%
एसबीआय (SBI) ग्रीन कार लोन (इलेक्ट्रिक वाहनांसाठी): 9.1% ते 10.15%
दुचाकी कर्ज: 13.35% ते 14.85%
इलेक्ट्रिक वाहनांसाठी व्याजदरात 0.5% सूट
एसबीआयने (SBI) हरित वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्पर्धात्मक व्याजदर देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ठेवींवरील व्याजदर कमी झाल्यास, भविष्यात आणखी स्वस्त कर्ज मिळण्याची शक्यता आहे.