Top News आरोग्य कोरोना

चिंताजनक! राज्यात आज 23 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात २३,३६५ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात २३,३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ११,२१,२२१ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण २,९७,१२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज १७,५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७,९२,८३२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ७०.७१ % एवढं झालं आहे.

राज्यात आज ४७४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५५,०६,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,२१,२२१ (२०.३६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,५३,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मला सुशांतच्या नावाचा गैरवापर करुन मिळणारी प्रसिद्धी नकोय- निया शर्मा

‘मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी करावं’; ‘या’ शिवसेना खासदाराची मागणी

दिलदार माणूस! कोरोनाच्या काळातही रतन टाटांनी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला कोट्यवधींचा बोनस

…तर एटीएममधून पैसे काढताना ओटीपीची आवश्यकता, SBI चा नवा नियम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या