बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकं सांगतात…एका एकराला 18 कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या की”

पुणे | महाराष्ट्र समुद्धी महामार्ग हा राज्यातील 10 जिल्ह्यांतील 26 तालुके आणि जवळपास 390 गावांमधून जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची जागा जाणार आहे. यावर राज्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध देखील केला होता. त्याचबरोबर राज्यात सध्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यावेळी ते पुण्यात बोलत होते.

एक काळ असा होता की, त्यावेळी इतकं पैसे देणं कमी होतं, लोक वैतागून जायचे. आता त्यांच्या रकमा इतक्या वाढल्या आहेत की, लोक आम्हाला भेटून विचारतात. साहेब तो रस्ता चाललाय ना. तो आमच्या शेतातून जायाची व्यवस्था करा. सध्या इतका विरोधाभास झाला आहे आणि ही आजच्या परिस्थितीची तथ्यं आहेत. 20 वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात खूप मोठा फरक झाला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

रस्त्यांची कामं सुरू असताना भूसंपादन करावं लागतं. मधल्या काळात भूसंपादन करताना मोबदला देण्यासंबंधीत जे काही निर्णय झाले होते. त्यामध्ये इतर राज्यांपेक्षा आपापल्या अधिक रक्कम संबंधितांना द्यावा लागायच्या. येथे उपस्थित असलेल्या पुणेकरांना ऐकून आश्चर्य वाटेल की, परवा मी मुख्यमंत्री आणि सचिव सिताराम कुंटे आमच्यामध्ये बैठक झाली होती. त्यावेळी आमच्यापूढे 1 एकराला 18 कोटी रूपये देण्याची उदाहरणं आमच्यापुढे आली आहेत. एक एक एकराला 18-18 कोटी रूपये द्यावे हे व्यवहार्य नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या पुण्यात वेगवेगळ्या प्रकाराची रस्त्यांची कामे चालू आहेत. ते कामे वेळेत पुर्ण होणं गरजेचं आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

गर्लफ्रेंडचा राग बाॅयफ्रेंडच्या जीवावर बेतला, रागात फेकून मारला फोन अन्…

एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन

“महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार”

शेतकऱ्यांना आता 6000 ऐवजी मिळवता येणार पूर्ण 36 हजार रुपये, वाचा सविस्तर

“महिलांवर अत्याचार व्हावेत असं रावणालाही वाटत नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More