बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शेतकऱ्यांची अडवणूक केली तर याद राखा…’; अजित पवारांचा थेट इशारा

मुंबई | शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास यावर्षी अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच राज्यात सध्या पीक विम्याचे पैसे देण्यात कंपन्या टाळाटाळ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना धमाकीवजा सूचना दिल्या आहेत.

राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. तसेच हजारो कोटीच्या पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबिन आणि इतर पिकांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर अशा कंपन्यांवर गुन्हा दाखल करायला मागेपुढे पाहणार नाहीत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना पीक विमा देताना आम्ही वेडवाकडं करा, असं काही तुम्हाला सांगत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना नुकसानीमुळे पिक विमा मिळायला हवा, तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे न करता थेट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी विरोधकांनी ठाकरे सरकारकडे केली होती.

थोडक्यात बातम्या-

‘रूपाली चाकणकरांनी महिलांसाठी केलं तरी काय?’; शालिनी ठाकरेंचा हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; जाणून घ्या नेमकं काय आहे ‘TRUTH SOCIAL’

“मंत्रालय बंद असताना शरद पवारांच्या शागिर्दांनी 15 हजार कोटी लुटले”

मॅंचेस्टर युनायटेडची आयपीएलमध्ये एन्ट्री; ‘हा’ संघ विकत घेण्याची शक्यता

‘मालदीव आणि दुबईमध्ये त्यांची…’; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More