Top News

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना

मुंबई | जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

निवृत्त अप्पर मुख्य सचिवांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असणार आहे. ही समिती कोणाकोणाची चौकशी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जलयुक्त शिवार ही फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. मात्र, या योजनेते गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत महाविकासआघाडी सरकारने ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत एकूण सहा लाख कामे झाली. यापैकी मोजक्या कामांबद्दलच तक्रारी आल्या. सरकारी योजनेतील तक्रारींचा टक्का पाहता हे प्रमाण खूपच कमी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्योजकांनी ब्रँड अ‌ॅम्बेसेडर बनावं- उद्धव ठाकरे

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

“कोरोना काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला, महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं”

हो…काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर मी नाकारली; उर्मिला मातोंडकर यांचा खुलास

“पदाची अपेक्षा नाही; लोकांसाठी काम करायचंय म्हणून शिवसेनेत आले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या