बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

मुंबई |  राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट आणि दीड महिन्यापासून चाललेला लॉकडाऊन यामुळे राज्य सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी अनेक जण आपापल्या परीने मदत करत आहेत.

त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जाहीर केलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनाने 300 कोटी रुपये मदतीचा मोठा हातभार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लाभणार आहे.

गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्र सरकार कोरोनाला परतवून लावण्यासाठी झुंजत आहे. या कामी जनतेने देखील शासनाला मोलाची मदत केली आहे. 5 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी 70 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार का?; मोदी सरकारने केला मोठा खुलासा

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

आज राज्यात 1230 नवे कोरोनाबाधित; पाहा तुमच्या जिल्ह्यात किती रूग्ण….

पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्र सरकारने मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावं- उद्धव ठाकरे

पुणे विभागात आतापर्यंत 1237 रूग्ण ठणठणीत; पाहा प्रत्येक जिल्ह्यातील रूग्णांची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More