बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई | कोरोनाचे संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. याविरोधात भाजपातर्फे मंगळवारी राज्यभर स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले गेले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले.

महाराष्ट्र भाजपाच्या वतीने राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन देऊन फडणवीसांनी राज्य सरकारच्या कामाकडे लक्ष वेधले. यावेळी विनोद तावडे, आशिष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, अतुल भातखळकर उपस्थित होते.

स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड होतीये, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत. गरिबांना रेशनधान्य मिळत नाहीत, रुग्णसंख्या लपविण्याचे प्रकार सुरू आहेत तसंच मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आह, असा आरोप फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे.

इतर सर्व राज्य विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे इतर राज्यांतील सरकारांनी दिलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांना मदत द्यावी, अशी मागणी फडणवासांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक; मुख्यमंत्र्यांची माहिती

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

एकाच दिवसात 1200 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी… पाहा तुमच्या भागात काल किती नवे रूग्ण

पुण्यात काल 110 जण कोरोनामुक्त; पाहा किती नव्या रूग्णांना झालीये कोरोनाची बाधा…

“एक-दोन कोरोनाबाधित आढळले तर संपूर्ण कार्यालय बंद करण्याची गरज नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More