Top News महाराष्ट्र मुंबई

सरकारचा ‘हा’ डाव मी यशस्वी होवू देणार नाही- सुनील तटकरे

मुंबई | कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. मात्र सरकारचा हा डाव मी यशस्वी होवू देणार नाही, असा इशारा रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.

कोयना आणि मुळशी धरणातील पाणी कोकणाव्यतिरीक्त अन्यत्र वळवण्यासाठी काय करावं लागेल यासाठी सरकारने समिती नेमली असल्याचं तटकरेंनी सांगितलं आहे.

सरकारने नेमलेल्या समितीने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार कोयना आणि मुळशी धरणातील पाणी पूर्वेकडे वळवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप तटकरे यांनी केला आहे.

दरम्यान, सरकारच्या भूमिकेमुळे कोकणातील पाणी समस्या तीव्र होईलच. शिवाय कोकणातील जलविद्यूत प्रकल्प बंद होतील, असं तटकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”

-शिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ??

-प्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत

-मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का??; उदयनराजे चिडले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या