Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

Phot Credit- Facebook/ Bhagatsingh koshyari, Udhhav Thackarey

मुंबई | गेल्या आठवड्यात राज्य सरकारनं राज्यपालांना उत्तराखंड येथे जाण्यास सरकारी विमान उड्डाणास परवानगी नाकारल्यानं वाद निर्माण झाला होता. अशात नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधिमंडळाच्या 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच घेण्यात यावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्षपद हे पुन्हा काँग्रेसलाच मिळणार, असं काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत आहेत. अधिवेशन सुरू होण्यास आता केवळ 11 दिवसांचा अवधी आहे. एवढ्या अल्प काळात काँग्रेसचा उमेदवार ठरणं, त्याला अन्य दोन पक्षांनी सहमती मिळणं ही कसरत महाविकास आघाडी सरकारला करावी लागणार आहे.

1 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी राज्यपालांनी राज्य सरकारला थेट पत्र लिहिलं आणि पत्रातून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार ही विचारणा केली आहे. सरकार राज्यपालांच्या या पत्राला उत्तर देणार असच्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पर्शवभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस

चिंताजनक! मुंबईतील ‘या’ भागांमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना

‘ऐकलं नाहीत तर याद राखा’; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या