बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारची मोठी घोषणा; मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

मुंबई | देशात आरक्षणाच्या (Reservation) लढाईत अनेकांनी आपले प्राण पणाला लावले होते. देशाच्या इतिहासात मराठा आरक्षण (Maratha Movement) आंदोलनाला एक वेगळं स्थान आहे. राज्यानं कधी पाहिले नव्हते असे लाखोंचे मोर्चे आपल्या राज्यात काढण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत मराठा बांधवांनी आपले प्राण त्यागले होते. त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची घोषणा (Helped Annouced) ठाकरे सरकारनं (Thackeray Goverment) केली आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे. आरक्षणाच्या लढाईत मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपयांची (10 Lack Rupees) मदत जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण लढ्याला एकप्रकारची सहानुभुतीपुर्वक मदत केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यातील आंदोलकांचा यामध्ये समावेश आहे. ही आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबांमध्ये औरंगाबाद 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे, अशी माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे

थोडक्यात बातम्या 

“आधी आमच्या शेतातील वीज खांबाचं भाडं द्या अन् नंतरच वीज कनेक्शन कापा”

“शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत, ते भाजप सोडून गेले नाहीत”

चुकीला माफी नाही! KL Rahul आणि Rashid Khan यांंच्यावर 1 वर्ष बंदीची शक्यता

गृहिणींसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता

‘Omicron’ फक्त नावाचा खेळ! मिळाला 900 टक्क्यांचा रिटर्न्स; वाचा नेमका प्रकार काय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More