बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं अखेर निलंबन

मुंबई | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambeer Singh) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख  (Ex Home Minister Anil Deshmukh)  यांच्यावर 100 कोटींची खंडणी वसूल केल्याचे आरोप केल्यानंतर परमबिर सिंग हे देखील अडचणीत आले आहेत. परमबीर सिहांवर शिस्तभंगाची कारवाई सुरु होती. त्यातच आता त्यांना राज्य सरकारने मोठा झटका दिला आहे.

राज्य सरकारने परमबीर सिंह यांना सेवेतून निलंबीत करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. काल मुख्यमंत्र्याना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी परमबीर सिंहाच्या निलंबनाच्या आदेशावर सही केली होती. परमबीर सिंह यांच्यासह ठाणे शहराचे डिसीपी पराग मणेरे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.

परमबीर सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यांनी 200 दिवसांहून अधिक दिवस गृह विभागाला न कळवता सुट्टी घेतली होती. निलंबनाच्या कारवाईनंतर थेट सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली जाणार आहे. परमबीर सिंह यांच्यावर खंडणीच्या आरोपाखाली FIR दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, परमबीर सिंह हे अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर अचानक गायब झाले होते. 234 दिवसांनी ते परतले होते. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्यावर 5  वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

तेलंगणातून चिंता वाढवणारी बातमी समोर, तब्बल ‘इतके’ विद्यार्थी सापडले पॉझिटीव्ह

‘मी सीडी काढली तर…’; मलिकांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

‘भारतासाठी पुढील 2 आठवडे महत्त्वाचे’; तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

“अमरावतीत झालेला प्रकार संयोग नव्हे तर प्रयोग होता”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More