‘… तर महाराष्ट्र पेटवू’; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
रत्नागिरी | बारसू (Barsu) रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सोलगावात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
वेळेला बारसू (Barsu) येथील प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या असं आवाहन करत बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही, असा इशारा दिला.
एकूणच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बारसू (Barsu) येथील रिफायनरीला विरोध कायम असून ग्रामस्थांच्या भूमिकेला सरकारचा पाठिंबा असल्याचं जाहीर करत कुठल्याही परिस्थिती हा प्रकल्प होऊ देणार नाही. येथील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान होऊ देणार नाही अन्यथा पेटवून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण मुख्यमंत्री असताना दिलेल्या पत्राच्या संदर्भातही माहिती देत शिवसेना कोकण वासियांच्या बरोबर असल्याचं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- “कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही”
- मोठी बातमी! सापळा रचून पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
- ‘खुटा हलवून जाम करण्याचा प्रकार’; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका
- ‘शरद पवारांचा हा पावर गेम होता’; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Comments are closed.