Top News आरोग्य कोरोना चंद्रपूर

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पदं त्वरित भरणार- आरोग्यमंत्री

चंद्रपूर | राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसतोय. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारद्वारे प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूरमध्ये कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सर्व पदं राज्य सरकार तातडीने भरणार आहे. कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांना वाढीव प्रोत्साहन भत्ता देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार निश्चितपणे विचार करेल, असं आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलंय.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी बैठकीत मुनगंटीवार म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांच्या जागा तातडीने भराव्यात. त्याचप्रमाणे सीपीएच्या दहा जागा तातडीने भरण्यात यावा.

बीएएमएस, एमबीबीएस डॉक्टर्स, नर्सेस यांची माहिती मागवून त्यांना थेट नियुक्ती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “खाजगी रूग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार यांना विमा संरक्षण देण्याची मुनगंटीवार यांची सूचना रास्त आहे. यासंदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल.”

खनिज विकास निधीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना आधुनिक पध्दतीचे ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर देण्यात यावं. कोरोना संसर्ग बघता दिवसांचा प्रतिबंधात्मक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने आखावा आणि त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

“मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अनाकलनीय”

व्यंगचित्रावरुन आता शिरुरमध्येही राजकारण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत स्टेटस वॉर सुरु!

“देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही”

नागपूरात आता मास्क न वापरल्यास भरावा लागणार इतका दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या