New vehicle l आजकाल स्वतःची एक तरी कार असावी असं अनेक नागरिकांचं स्वप्न असतं. त्यामुळे नागरिक ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असतात. मात्र आता जर तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता राज्य शासन नवं धोरण राबवणार आहे. त्यामुळे कार खरेदी करण्याचं स्वप्न साकार करण कठीण जाणार आहे.
वाहन खरेदीवर निर्बंध येणार? :
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा विचार राज्य परिवहन विभाग करत आहे. कारण जपानच्या धर्तीवर राज्यात एक नवीन धोरण राबवलं जाणार आहे. मात्र त्यासंदर्भात एक आराखडा देखील तयार करण्यात आला असून, यामध्ये नव्या धोरणाचा समावेश असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कारण दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी आणि वाहनं उभी करण्यासाठी कमी पडणारी जागा, याशिवाय दररोज होणारे रस्ते अपघात, इंधनाचा अमर्याद वापर या सर्व गोष्टींवर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा राज्य सरकारकडून विचार सुरु आहे.
New vehicle l यामागचं कारण काय? :
दरम्यान, राज्य सरकार आता थेट जपानच्या धर्तीवर हे नवं धोरण राबवण्याच्या तयारीत आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहन खरेदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार हे धोरण राबवणार आहे. तसेच बहुविध देशातील पर्याय आणि धोरणं विचारात घेऊन जपानच्या धोरणावर देखील एकमत झाल्यानंतर तज्ज्ञ आणि शासकीय संस्थांसह चर्चेदरम्यान या नवीन धोरणाला हिरवा कंदिल मिळाल्या नंतर ते राज्य शासनाकडे पाठवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
याशिवाय समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात प्रत्येक वर्षी साधारण 5 ते 8 टक्के या फरकानं वाहन खरेदीचा वेग आणि प्रमाण वाढतं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात नवनवीन वाहनतळं किंवा तत्सम सुविधा देखील अपुऱ्या पडत असल्यानं राज्य सरकार हे धोरण राबविण्याच्या तयारीत आहे.
News Title : state govt to make new rules to control new vehicle Purchase
महत्वाच्या बातम्या –
सरपंच हत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती, वाल्मिक कराडचा पाय खोलात?
लग्नसराईत दागिने घ्यायचा विचार करताय?, पाहा लेटेस्ट 1 ते 10 ग्रॅम सोन्याचे दर
भयंकर! वर्षभराच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, नंतर मृतदेह गोणीत भरून…
आज पुत्रदा एकादशी, भगवान विष्णू ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनी मौन सोडले!