बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याचे गृहमंंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार? जयंत पाटील म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. त्यामुळे अशा वावड्या उठवण्याची गरज नाही. राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख हेच राहणार आहेत. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

माध्यमांमध्ये कुणाच्याही नावांची चर्चा असली तरी खातेबदल होण्याची शक्यता नाही. सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठलीही चूक केल्याचे दिसून आलेले नाही. गृहमंत्री अनिल देशमुख हे योग्य प्रकारे काम करत आहेत. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नाही. तपासामधून जे सत्य समोर येईल, ते न लपवता आम्ही कारवाई करणार आहोत, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणीपोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. एनआयएने केलेल्या चौकशीमध्ये सचिन वाझे यांनी काही बडे पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे सरकारला कोंडीत पकडलं होतं, इतकचं नव्हे तर सचिन वाझे हे लादेन आहेत का? असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता.

थोडक्यात बातम्या- 

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं; ‘या’ बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार?

प्री-माॅन्सून सिझनला सुरवात; ‘या’ राज्यात पावसाची शक्यता

महापौर निवडणुकीआधीच जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप?

मोठी बातमी! सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More