बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“..त्यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा नाहक त्रास देतात”

पुणे | राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडी, सीबीआय, एनसीबी या केंद्रीय यंत्रणाचा उल्लेख वारंवार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते मंचर येथे पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

गेल्या सहा महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. काहीतरी निमित्त काढून महाविकास आघाडीतील नेत्यांना चुक की बरोबर याचा विचार न करता अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो चूकीचा वागला असेल त्याच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही, मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर कारवाई होत नाही. याचा अर्थ राजकीय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील सरकार यांच्या डोळ्यात सलतंय आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका वळसे पाटील यांनी केली.

राज्याचे बजेट कोरोना महामारीत खर्च झाले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार राज्याचे जीएसटीचे पैसे आणि इतर मदत द्यायला तयार नाही, अशा परिस्थितीत राज्य कारभार करावा लागत आहे. वेळ पडली तर कर्ज काढून राज्यातील समस्या सोडवणार, असंही वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप लावले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, शिवसेना नेते अनिल परब, एकनाथ शिंदे, आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.

थोडक्यात बातम्या-

आयकर विभागाच्या धाडीनंतर प्रथमच अजित पवारांचा बारामती दौरा, मतदारसंघातील महिला म्हणतात…

अजित पवार यांच्यावरील कारवाई योग्यच, पण…- राजू शेट्टी

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत चौरंगी लढत होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?”

आज संध्याकाळपर्यंत ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More