बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘क्रूझ पार्टीमध्ये राज्यातील ‘तो’ मंत्री सहभागी’; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई | मुंबईत झालेल्या कार्डेलिया क्रूझ पार्टीबद्दल दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईनंतर केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशातच भाजपचे माजी पदाधिकारी मोहीत कंभोज यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

कार्डेलिया क्रूझ प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांचा 100 टक्के सहभाग आहे. योग्य वेळ आल्यानंतर सर्वांची नावं बाहेर काढणार असल्याचा इशाराही मोहीत कंभोज यांनी यावेळी दिला. मंत्रिमंडळातील ती व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्यावर  यावर त्यांनी ‘जिथं माहिती दयायची आहे तिथं देणार’ असं मोहीत कंभोज यांनी म्हटलं आहे.

विनापरवानगी कोणतेही क्रूझ कोणत्या राज्यात येऊ शकत नाही. त्यासाठी परवानगी घेतली असेलच. सात ऑक्टोबरला राज्यात मंदिर सुरू झाली मग क्रूझ पार्टीला परवानगी कोणी दिली? असा सवालही त्यांनी विचारला आहे. कोणत्याही मंत्र्याकडे इशारा करत नसल्याच कंभोज म्हणाले आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय सीमेवरुन कोणतेही जहाज आले तर त्याची परवानगी सरकार देते. मग ही परवानगी कोणी दिली? क्रूझपार्टीला दोन तारखेची परवानगी देण्यात आली मात्र महाराष्ट्रामध्ये सात ऑक्टोबरला मंदिरं उघडली. या प्रकरणामध्ये हायप्रोफाईल लोक आहेत. मला वाटतं की यात एक मोठं सिंडिकेट सहभागी आहे. याची चौकशी व्हायला हवी. परवानगी कोणी दिली, किती रुपयांचा व्यवहार झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या –

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं’; नवाब मलिकांचा शायरीतूून टोला

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

“आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरूष, बाबरी तोडली तेव्हा काखा वर करून पळालो नाही”

‘…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले’; पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More