बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुणे | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर धाड टाकल्यामुळे शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक झाली. त्यानंतर याप्रकरणावरून राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहे. त्यामुळे राज्यात या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागल्याचं चित्र सध्या दिसत आहेत.

केंद्रीय यंत्रणाचा वापर करून हजारो कोटी रूपयाची वसूली केली जात आहे. हे अधिकारी आणि भाजपचे नेते लोकांना दवाब निर्माण करण्याचं काम करत आहेत. समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचा बाप बोगस होता. त्याच्या घरातील सगळेच बोगस होते, असा समीर वानखेडे यांचा एकेरी उल्लेख करत मलिक यांनी वक्तव्य केलं आहे.

नवाब मलिकांच्या जावायला तुरूंगात टाकताना वरून दवाब टाकणारा तुझा बाप कोण? तुला तुरूंगात टाकल्याशिवाय शांत राहणार नाही, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. आज शाहरूख खानने आर्यन खानची भेट घेतली. तसेच न्यायालयाने आर्यन खानच्या कोठडीत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

थोडक्यात बातम्या-

”फाटली म्हणून भाजपमध्ये गेले का?, गेले ते गेले…”

‘तो भारतासाठी खूप काही करू शकतो’; वर्ल्ड कपआधी कपिल देव यांनी केलं ‘या’ खेळाडूचं कौतुक

जखमी असतानाही कोलकाताचा ‘हा’ खेळाडू खेळला प्लेऑफचे सामने

‘आरोप सिद्ध झालेत आता त्यांनी राजीनामा द्यावा’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

अन् शाहरूख खानला झाला ‘त्या’ नियमांचा फायदा! आर्यनला धीर देत शाहरूख म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More