Top News महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्याची आवश्यकता- अशोक चव्हाण

मुंबई | केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

‘केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. या कायद्यांमुळे तेथील शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा सुधारित कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्व‍ीकारावी’, असं अशोक चव्हाण यांनी राज्याच्या कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणाले आहेत.

‘राज्याच्या नविन कायद्यामध्ये खासगी खरेदीदारांना कृषीमालाच्या खरेदीचे करार व व्यवहार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने करण्यास प्रतिबंध घालणे, शेतमाल खरेदी-विक्रीबाबतचे करार व व्यवहारांसाठी शेतकऱ्याची संमती अनिवार्य करणे, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क प्रदान करणे, शेतकऱ्यांची फसवणूक अथवा छळ केल्यास दीर्घ मुदतीचा कारावास तसेच मोठ्या रक्कमेच्या आर्थिक दंडाची तरतूद करणे, व्यापाऱ्यांना शेतमालाचा अमर्याद साठा करता येणार नाही यासाठी साठवण क्षमतेवर मर्यादा घालणे,  अशा तरतूदींचा समावेश चव्हाण यांनी आपल्या पत्रात केला आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी पाठवलेल्या पत्राला राज्य सरकार गांभीर्यानी घेतं की नाही. तसेच यावर राज्य सरकार काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बोतम्या-

‘शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…’; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

गोपिचंद पडळकरांचे संजय राऊतांना पत्र; शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमच्या…

“उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर कोणतेही आक्षेपार्ह ट्विट करणार नाही”

ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि मिळवा एक लाखाचं बक्षीस

”इतक्या’ वर्षात देश होणार टोलमुक्त’; नितीन गडकरींची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या