अभ्यासाच्या नावाखाली शेतकरी संपाची धार कमी करण्याचा डाव!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सरकारचा विचार आहे, त्यासाठी अभ्यास सुरु आहे, अशा बातम्या माध्यमांमधून देण्यात आल्या आहेत. मात्र अभ्यासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न असल्याची आणि संपाची धार कमी करण्यासाठी अशा बातम्या प्रसारित करण्यात येत असल्याची शंका आहे.

शेतकरी संपानं दुसऱ्याच दिवशी मोठ्या शहरांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे राज्य सरकार हवालदिल झालं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी अभ्यासाच्या नावाखाली पुन्हा एकदा संप बोथट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं दिसतंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

Comments are closed.