बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 ला आम्ही बारामती जिंकणार म्हणजे जिंकणारच”

बारामती | महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने सगळ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपचं आता मिशन बारामती (Baramati) सुरू झालं आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष (State president of BJP)  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनीही तयारी सुरु केली. पवारांच्या प्रचाराचा नारळ ज्या मंदिरात फुटतो त्याच मंदिरात नारळ फोडून बावनकुळेंच्या प्रचाराला सुरूवात झाली.

2024 ला आम्ही बारामती सहीत अनेक लोकसभा जिंकू. यापुर्वी बारामतीत अशी फाईट कधी झाली नसेल अशी फाईट आता होईल. शिवसेना आणि भाजप मिळून बारामती लोकसभा (Lok Sabha) जिंकणारच, असा निर्धार बावनकुळेंनी व्यक्त केला. बारामतीत पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्राला 45 प्लस आणि विधानसभेला ( Legislative Assembly) 200 प्लस सूत्र आम्ही ठरवलं आहे, असंही ते म्हणाले

सध्या बारामतीत भाजपचे संघटन मजबुत करण्याच कामं सुरु आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी आताच भाजपचे प्रयत्न सुरु झाले आहे. येत्या 18 महिन्यात केेंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) सीतारामण सात ते आठ वेळा बारामतीची भेट घेतील, असंही बावनकुळे यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘तेव्हा तुम्ही सी ग्रेड फिल्ममध्ये…’; शिवसेनेचा नवनीत राणांवर घणाघात

“ज्यांच्याकडे 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कात व्हावा”

‘तू ठाकरे है तो मै राणा हूँ, देखते है…’; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना इशारा

शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; दसरा मेळाव्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर

पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र आता नगरमध्ये, विखेंच्या प्रयत्नाला यश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More