Top News महाराष्ट्र मुंबई

‘धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या नाहीतर…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई | मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे वादात सापडले आहेत. रेणू शर्मा  नावाच्या तरूणीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणाबरोबर मुंडे यांनी आपण करुणा शर्मासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं सांगितलं आहे. बलात्काराचे आरोप करणारी तरूणी हा करूणा शर्मा यांची बहीण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झालं असून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात खापरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. या घटनेमुळे समाजावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचं गांभीर्य ओळखून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं खापरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मुंडेंचा राजीनामा घ्यावा नाहीतर आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल याची आपण नोंद घ्यावी, असं म्हणत खापरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा

राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…

“आमच्याविरूद्ध तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुणे महानगरपालिका जिंकू”

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या