बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतकंही वाहून जाऊ नका की, शरद पवार माझ्या वडिलांसारखे आहेत म्हणण्याची वेळ येईल”

मुंबई | अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर भाजप नेते या प्रकरणावरून ठाकरे सरकारला डिवचताना दिसत आहे. त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढले. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन टोला लगावला आहे.

शेवटी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पण प्रश्न अजूनही उपस्थित होत आहे की नवीन वसुली मंत्री कोण असणार? पदावरील मंत्र्यांचा चेहरा बदलल्यानं महाविकास आघाडीच्या सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही. असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं. यावरून रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

‘चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल आहेत आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई, भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत पवार साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत हे म्हणण्याची वेळ येईल. थोडा धीर धरा ठेवा, सत्य समोर येईल’, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे.

दरम्यान, किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं दाखल केलेला गुन्हा 2016 साली भाजप सत्तेत असताना दाखल झाला होता. त्याची चौकशी आज गुन्हा दाखल होण्यापर्यंत येऊन पोहोचली होती, अशी टीका देखील रुपाली चाकणकर यांनी याआधी केली होती.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI टीम आज मुंबईत येणार

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड

“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

सोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More