बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MPSC चा निकाल जाहीर! प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मुलींमध्ये मानसी पाटील

मुंबई | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा देखील अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षामध्ये साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. तर मानसी पाटीलने मुलींमध्ये बाजी मारली आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून एकुण 420 पदांसाठी भरती घेण्यात आली होती.

राज्य लोकसेवा आयोगाची 13 जुलै 2019 ते 15 जुलै 2019 या दरम्यान परीक्षा झाली होती. एमपीएससीकडून एकुण 26 वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात आली होती. ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक या पदांचा समावेश होता. गेल्या काही दिवसापासून स्पर्धा परीक्षेचे उमेदवार निकालाची मागणी करत होते. परंतु आज अखेर मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

रोहन कुंवर याने मागासवर्गीयांमध्ये पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर दादासाहेब दराडे याला राज्यात चौथा क्रमांक मिळाला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारीत अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे अनेक स्पर्धा परीक्षा भरतीला ब्रेक लागला होता. त्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी नैराश्यात गेले होते. एमपीएससीच्या निकालाची मागणी विद्यार्थी राज्य सरकारकडे सातत्याने करत होते. त्यामुळे आज आयोगाने निकाल जाहीर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल परबांनंतर शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या अडचणी वाढल्या

अखेर कन्हैय्या कुमारांची राहुल गांधींना साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश!

2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड महापौर मॅडमना द्यायला पाहिजे- निलेश राणे 

जर काँग्रेस वाचली नाही तर….’; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैया कुमार गरजला

21 कोटींची बोली लागलेल्या सुलतानने घेतला अखेरचा श्वास! मालक ‘बनीवाल’ करत होता तब्बल ‘इतका’ खर्च

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More