महाराष्ट्र मुंबई

आनंदाची बातमी- राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

मुंबई | राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहेत.

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुढच्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस

MPSC ची 20 सप्टेंबरची परीक्षा ‘येथे’ होणार, पटोलेंच्या सूचनेची अंमलबजावणी होणार

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या