बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! राज्याच्या रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर, वाचा आजची आकडेवारी

मुंबई |मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 16 हजार 577 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 10 हजार 891 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 295 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 470 रूग्णांच्या मृत्युची महाराष्ट्रात नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 55,80,925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 95 टक्क्यांजवळ पोहोचला आहे. सध्या राज्यात 11,53,147 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,225 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,67,927 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘कोव्हीशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेला वर हवा’, व्हायरल जाहिरातीची जोरदार चर्चा

“पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

“ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना मदत करावी”

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More