मुंबई | शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 24 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
आज रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकनाथ शिंदे आपल्या मुलासोबत घरी गेले. घरी जाण्याअगोदर खासदार श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फडणसाळकर या शिवाय इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी होम केला होता. कोरोनावर मात केल्यावर शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो- चंद्रशेखर आझाद
‘राहुल गांधींना काही काम नाही त्यामुळे…’; भाजपच्या मुख्यमंत्र्यांची टीका
औरंगाबाद पोलिसांना राहिला नाही मोक्षदा पाटलांचा धाक; तंबी देऊनही लाचखोरी सुरुच!
‘हा ही बलात्काराएव्हढाच मोठा गुन्हा आहे’; अभिनेत्री हेमांगी कवीने त्या फोटोवर व्यक्त केला संताप