‘भाजपत येणाऱ्यांना आम्ही स्वच्छ करतो’; भाजप आमदाराचं वक्तव्य

मुंबई | ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर (Bjp) टीका केली जातेय. याच पक्षप्रवेशावर भाष्य करताना भाजप आमदार (Bjp Mla) रमेश पाटील (Ramesh Patil) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ते गुजरातहून येतं. त्यामुळे आम्ही साफसफाई करुन जो माणूस आमच्याकडे येतो तो माणूस स्वच्छ होणार आहे, असं रमेश पाटील (Ramesh Patil) म्हणालेत.

त्यांनी तिथे काय केलं ते आम्हाला माहिती नाही. कुणीतरी सांगितलं की 400 कोटींच्या एमआयडीसीच्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले आहेत. पण त्यासाठी ते इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करतंय आणि चांगला न्याय देतंय म्हणून ते इथे आले आहेत, असा दावा रमेश पाटील यांनी केला

दरम्यान, रमेश पाटील यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More