बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन आस्मानचा फरक”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. “बाळासाहेबांवर माझं प्रेम आहे. हे प्रेम राजकीय किंवा बेगडी नाही. शिवसेना-भाजप एकत्र यावेत या इच्छेतून मी बाळासाहेबांवर प्रेम करतो असे नाही.” असेही ते म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, “बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यात जमीन आस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब असताना आम्हाला कशाचीच भीती नव्हती. त्यामुळेच बाळासाहेबांवरील माझं प्रेम हे राजकीय नसून त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी असल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

त्यांनी बाळासाहेबांबद्दल  एक अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले, “मी मुंबईमध्ये राहतो.  माझ्या मुंबईच्या घराच्या चारही बाजूने मुस्लिम वस्ती होती. त्यामुळे जेव्हा दंगली व्हायच्या तेव्हा भीतीची परिस्थिती असे. मात्र, त्याकाळची शिवसेना आम्हाला पंधरा- पंधरा दिवस स्थलांतरीत करायची. बाळासाहेब असताना आम्हाला कशाचीही भीती नव्हती.” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

शिवसेनेसोबत युतीच्या प्रश्नावर ते म्हणाले, “आम्हाला शिवसेनेचा व्यवहार पटत नाही. राज्यात जे काही सध्या सुरु आहे. ते चुकीचं आहे. भाजपला शिवसेनेसोबत जाण्याची बिलकूल इच्छा नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि सध्याच्या शिवसेनेमध्ये खुप फरक आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही”, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

वयाच्या 100 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली

आता आधी पैसे मगच वीज, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भाजपचा मोठा निर्णय?, चित्रा वाघ यांच्यासाठी आनंदाची बातमी

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच, पाहा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील आजची कोरोना रुग्णसंख्या जाणून घ्या एका क्लिकवर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More