बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस नेत्यांची सायकलवरुन राजभवनाकडे कूच, विविध प्रश्नांवर राज्यपालांना निवेदन

नाशिक |  सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच सध्या देशात इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई असे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. या प्रश्नांवरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत आहेत.

अशातच आज काँग्रेस नेत्यांनी सायकलवरून राजभवनात जाऊन राज्यपालांना इंधन दरवाढ, महागाई, कृषी कायदे, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुन निवेदन दिलं आहे. मलबार हिल येथील हँगिंग गार्डन पासून राजभवनापर्यंतचं अंतर काँग्रेस नेत्यांनी सायकलने पार केलं आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड असे काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते.

काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनेक मुद्यांवरून काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना धारेवर धरलं. महागाईने जनतेचे कंबरडे मोडलंय. मोदी सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे, असा घणाघाती हल्ला यावेळी नाना पटोले यांनी केला आहे.

तसेच शेजारच्या देशांना भारत पेट्रोल  30 रुपये लीटर दराने देत आहे. मात्र आपल्याच लोकांना यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत, असा देखील आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाबद्दल अ‍ॅलर्जी, भाजप देशाचा चेहरा बिघडवत आहे”

‘…अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही’

आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारनं कृषी विधेयक मागे घ्यावं-राजू शेट्टी

‘ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार’; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, अशा प्रकारे पाहा निकाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More