Baba Siddiqui | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निर्मलनगरच्या कोलगेट मैदानाजवळ त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दीकी याच्या कार्यालया बाहेर हा हल्ला करण्यात आला.
गँगस्टर रोहित गोदाराचं वक्तव्य चर्चेत
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्विकारली आहे. या प्रकरणातील नवनवे खुलासे आता समोर येत आहेत. सलमान खान याला घाबरवण्यासाठीच ही हत्या केल्याचं बोललं जात आहे. तर आता बिश्नोईचा खास मित्र रोहित गोदाराचं एक विधान चर्चेत आलं आहे. सलमान खानचा जो जवळचा तो आमचा शत्रू असे तो म्हणाला होता.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सामील असणाऱ्या चार पैकी तीनजण तुरुंगात एकत्र होते. तिथे बिष्णोई गँगच्या एका शूटरशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर हे तीनही आरोपी बिष्णोई गँगमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली.
बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी या आरोपींना सुपारी मिळाली होती. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर 50 – 50 हजार रूपये त्यांना मिळणार होते. त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सिद्दिकी यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यांच्या घराबाहेरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिस आणि आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहेत. आता अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवत आहेत. सध्या सलमान खानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील तिसरा आरोपी पुण्यात करत होता नोकरी!
‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ
बिश्नोई गँगकडून सिद्दीकींच्या हत्येचा खुलासा, ‘त्या’ पोस्टमुळे एकच खळबळ