बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचा विठ्ठल चांगला आहे, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय”

मुंबई | शिवसेनेत आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे.

ठाकरेच्या अवतीभवती असलेल्या लोकांमुळे हे आमदार नाराज होउन बाहेर गेले. हेच बडवे कोणाला मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण बदलण्याची गरज आहे, असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.

हा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांचे जवळचे मिलिंद नार्वेकर यांना लगावल्याचं बोललं जात आहे. ते अकार्यक्षम आहेत. तेच आमदारांना मुख्यमंत्र्यां भेटू देत नाहीत, असा आरोप भुयार यांनी केला आहे. शिवसेनेचे नाराज झालेले हे आमदार आणि एकनाथ शिंदे परत येतील. महाविकास आघाडीवर ओढवलेलं हे संकट लवकर दुर होईल, असा विश्वास देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र भुयार हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सर्मथक मानले जातात. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र भुयार यांना सुचना दिली त्यानुसार ते मुंबईला रवाना झाले आहेत.

थोडक्यात बातम्या

‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक

‘सरकारचा फायदा घटक पक्षांना, शिवसैनिक मात्र फक्त भरडला गेला’; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

“वाद सैन्य दलाच्या भरतीचा होता, मात्र चलाखीने शिवसेनेचा मुद्दा पुढे आणण्यात आला”

“समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More