बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, म्हणतात…

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी केलेल्या वक्तव्याने जगाचं टेन्शन वाढलं आणखी वाढलं आहे. कोरोना व्हायरस दीर्घकाळ जगात राहणार आहे, असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, टेस्टिंग करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे अशा सार्वजनिक आरोग्याच्या उपायांवर पुन्हा जोर दिला जात आहे. लस घेतल्यानंतर बेजबाबदारपणे वागू नये. रोज काळजीपूर्वक वागणे गरजेचं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते, हे जगातील बर्‍याच देशांनी दाखवून दिलं आहे, असं टेड्रोस म्हणाले.

कोविडला रोखण्यात बरेच देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते देश आनंदोत्सव साजरा करत आहेत, अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. सर्व देशांमध्ये पुन्हा प्रवास आणि व्यापार सुरू व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. परंतु आता जेव्हा काही देशांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे तेव्हा लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असं टेड्रोस यांनी सांगितलं.

कोरोनाचं संकट दीर्घकाळ आपल्याबरोबर राहणार आहे. परंतु आपण सकारात्मक राहिलं पाहिजे, असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

गर्भवतीला रस्त्यातच सुरू झाल्या प्रसुतीकळा; मुंबई पोलिसांच्या गाडीतच महिलेनं दिला बाळाला जन्म

“एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं”

इथे मृत्यूही ओशाळला… एका पाठोपाठ एक मृतदेह, विद्युतदाहिन्याची धुरांडी वितळली!

‘मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली’; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More