बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली! राज्यपालांना निवेदन, लवकरच पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे राज्यात यावरून राजकारण चालू आहे. अशातच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आलं आहे.

आपल्या सर्वांना कल्पना आहे, मागील आठवड्यात मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला. त्या निकालाच्या अनुषंगाने आजची आमची ही भेट होती. त्या निकालपत्रावर आम्ही आमची प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं होतं, की त्यात जे सांगितलं गेलेलं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून केंद्राचा आहे, राष्ट्रपतींचा आहे आणि साहाजिकच आहे आम्ही राष्ट्रपतींनी व केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी, आमच्या ज्या भावना आहेत. त्या पत्राच्या माध्यमातून तिथं पोहचवण्यासाठी आज राज्यपालांची भेट घेतली अलल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांनाही एक पत्र देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने पहिली पायरी म्हणून राज्यपालांची भेट घेतली. आम्ही बोललो होतो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करु, ती आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून केली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना!; डॅाक्टरच्या पत्नीचं काळजाला हात घालणारं पत्र

मालदीवमध्ये कोसळलेल्या रॉकेटबाबत वॉर्नरने सांगितला थरारक अनुभव, पाहा व्हिडीओ

पुण्यात मोलकरणीने तब्बल 40 लाख रूपयांच्या सोन्यावर मारला डल्ला, अशा प्रकारे पोलिसांनी पकडली चोरी

नवऱ्याने आपल्या दुसऱ्या पत्नीची तलवारीने गळा चिरून केली हत्या

पोलीस पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टर पत्नी सेवेवर; ‘मला थांबणं शक्य नाही…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More