बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राच्या वकिलाचं स्टेटमेंट समोर आला आहे. कंटेंट वल्गर होता पण कायदेशीर भाषेत त्याला अश्लील म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद वकीलांनी केला आहे. तसेच तो कंटेट पॉर्न कॅटेगरीत येत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंगळवारी राजच्या वकिलांनी कोर्टात त्यांची बाजू मांडली.

राज कुंद्रा यांची अटत कायद्याला धरून नव्हती. अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नसेल तरच अटक करण्यात यावी. पण या प्रकरणात अटकेनंतर त्यांची चौकशी केली गेली, असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लिल साहित्य पाठवण्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो. प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवताना साहित्य असल्यास त्याला कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न म्हणतात. इतर सर्व साहित्याला अश्लील म्हणता येईल, असं वकिलांनी म्हटलंय.

दरम्यान, पोलिसांच्या हाती लागलेल्या राज कुंद्राच्या सर्व्हरमधून कुंद्रा याची पूर्ण पोलखोल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्याचे फोनही जप्त केले आहेत. तसेच हे फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राज कुंद्रा याची पोलखोल करण्यासाठी फोन आणि सर्व्हर या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचंही सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही’; मंत्र्यानं केला मोठा निश्चय

‘देशात ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागला ‘; गडकरींचा व्हिडीओ व्हायरल

“राज्याचे प्रश्न कोमात अन् स्वबळाची छमछम जोरात”

“दादा… दोन हाना पण मला आपलं म्हणा, आता माफ करुन अबोला सोडावा”

…म्हणून इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार- अजित पवार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More