बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘धन्यवाद मोदी सरकार’, राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी; वाचा काय आहे प्रकरण

पुणे | वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ‘धन्यवाद मोदी सरकार’, अशा बॅनरच्या माध्यमातून राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मोदी सरकारचा जाहिर निषेध नोंदवला आहे. सर्वसामान्य नागरीक या महागाईने त्रस्त आहेत. त्यामुळे जनतेची लूटमार वेळीच थांबवावी यासाठी या माध्यमातून आम्ही निषेध नोंदवत आहोत, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.

फेब्रुवारी महिन्यांत 670 रुपयांना असणारा गॅस सिलेंडर हा 100 रुपयांना वाढला आणि 770 रुपयांना झाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गॅस दरवाढीची नोंद ही फेब्रुवारी महिन्यातली आहे. आता पुन्हा मार्च महिन्यात हा गॅस दरवाढ 50 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आज हा दर 820 रुपयांपर्यंत गेला आहे. गॅस दरात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याबाबत केंद्र सरकार अजिबात संवेदनशील नाही, ही योजना 5 कोटी महिलांपर्यंत पोहचवण्याची होती, मात्र ती पोहचली की नाही माहित नाही पण महिलांना या दरवाढीने मोदी सरकारने रडवलं आहे, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.

पंतप्रधान मोदीसाहेब, आजपर्यंत आपण जनतेची दिशाभूल केली, उज्ज्वला गॅस योजनेची खोटी जाहिरात केली, पंतप्रधान आवास योजनेचा खोटा भपका, पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, याबद्दल आपल्याला धन्यवाद. आतापर्यंत तमाम महिला भगिनींने हे सहन केलं. मात्र आता इथुन पुढे नाही, असा इशारा चाकणकर यांनी दिलाय.

दरम्यान, या दरवाढीमुळे महिला वर्गाचं बजेट कोसळलं आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कुठल्याही योजना आणल्या नाही. मोदी साहेब आपण सत्तेत येण्यापूर्वी आम्हा महिला भगिनींना आश्वासन दिलं होतं की जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवू. पण आपण कोणतंही आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधात आहे आणि म्हणून महिला वर्ग आता मोदींना मतदान करणार नाही, असा या आंदोलनाचा उद्देश असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

नवनीत राणांची बाजू घेत सरकारवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना चाकणकरांनी सुनावलं, म्हणाल्या…

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार का?, सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत

“ए भाई , तू जो कोण असशील…”; भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस भडकल्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More