बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्कच्या नावाखाली विकत होता स्टेशनरी; प्रशासनाने कारवाई केली अन् तो थेट गाडीखाली झोपला

यवतमाळ | सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे.  कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आहे. यामुळे छोट्या उद्योगांना तसेच व्यावसायिकांचे हालाकिचे दिवस सुरू आहेत.

अशातच यवतमाळ जिल्ह्यातील वाणी येथे एका व्यावसायिकावर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. हा व्यावसायिक मास्क विक्रीच्या नावाखाली स्टेशनरीच्या काही वस्तूही विकत असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचं समजतं.  मास्क व्यतिरीक्त अन्य कोणत्याही वस्तू विकण्यावर निर्बंध असल्याचं पालिका कर्मचाऱ्यांनी त्या व्यवसायिकाला सांगितलं. परंतू तो त्यांचं ऐकून घेत नव्हता.

त्यानंतर पथकाने त्या व्यावसायिकाची हातगाडी तहसील कार्यालयात जमा केली. संपप्त झालेला हातगाडी चालक चक्क प्रशासनाच्या वाहनासमोर अडवा झोपला. हे पाहायला त्याठिकाणी खूप गर्दी जमा झाली. काही वेळानंतर त्या ठिकाणी पोलीस आले असून, त्यांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये हातगाडी चालक प्रशासनाच्या गाडी समोर झोपलेला आहे. त्याच्या बाजूने एक महिलाही बसून असल्याचं दिसून येत आहे. ती महिला त्याची पत्नी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्या ठिकाणी काही त्या हातगाडी चालकाला चेतावणी देत आहेत. तर काहीजण आपल्या मोबाईलमध्ये या सगळ्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मोदी ‘त्या’ विद्यार्थ्याला म्हणाले, “तुम्हाला भविष्य समजते का?”

लस घेण्यासाठी काहीपण; ‘या’ अभिनेत्रींबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

“कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास तो नष्ट होईल”

महिला म्हणाली, “शाहरुखला भेटूनही इतका आनंद झाला नाही!; मोदींचं स्मितहास्य…

35 वर्षाय महिलेकडून 16 वर्षाच्या मुलावर… अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More