महात्मा गांधींचा पुतळा घाना विद्यापीठातून हटवला

नवी दिल्ली | महात्मा गांधी वर्णभेदी होते असं म्हणत आफ्रिकेतील घाना विद्यापीठातून महात्मा गांधींचा पुतळा हटविण्यात आला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचा महात्मा गांधींच्या पुतळ्याला विरोध होता. ‘द वायर’ने याबाबत वृत्त  दिले आहे.

महात्मा गांधी वर्णभेदी होते, असा आरोप विद्यार्थी आणि शिक्षकांचा होता. महात्मा गांधींचा पुतळा काढण्यासाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं.

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दबावापुढे झुकत अखेर घाना विद्यापीठानं महात्मा गांधींचा पुतळा रातोरात हटवला आहे.

दरम्यान,  भारत-घाना मैत्रीचं प्रतीक म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते घाना विद्यापीठात 2016 साली महात्मा गांधींचा पुतळा बसवला होता.

महत्वाच्या बातम्या –

-RAFALE DEAL: सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली- शरद पवार

-मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

-ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!

-माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी