बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐश्वर्या रायपासून दूर राहा; संजय दत्तला मिळाली होती धमकी

मुंबई | बाॅलिवूडमध्ये आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायने फक्त लोकांच्याच नाही तर अनेक अभिनेत्यांना देखील वेड लावलं होतं. अशातच अभिनेता संजय दत्तने एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्याला ऐश्वर्या पासून लांब राहण्याची धमकी देण्यात आली होती.

ऐश्वर्या राय आणि संजय दत्तने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली. संजय दत्तच्या बहिण प्रिया आणि नम्रता यांना देखील ऐश्वर्या प्रचंड आवडत होती. आपल्याला देण्यात आलेल्या धमकीबाबत संजयने एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी ऐश्वर्या मिस वर्ल्ड नाही तर बाॅलिवूडमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्र देखील नव्हती असं संजयने सांगितलं.

मुलाखतीत संजयने सांगितले की ऐश्वर्या तेव्हा केवळ एक माॅडेल होती. मात्र तिच्या सौंदर्याने अनेक लोकांना ती तेव्हा देखील आवडत होती. अशातच एका फोटो शूटसाठी ऐश्वर्या आणि संजय एकत्र काम करणार होते. यावेळी संजयच्या बहिणींनी त्याला फोटोशूटला जाण्याआधीच ऐश्वर्यापासून लांब राहण्याची धमकी दिली होती, असं संजयने सांगितलं आहे.

दरम्यान, फोटोशूटला गेल्यानंतर ऐश्वर्यावर लाईन मारायची नाही, तसेच तु तिला तिचा फोन नंबर देखील मागायचा नाही, अशा शब्दांमध्ये संजयच्या बहिणींनी संजयला बजावलं होतं. हा सर्व प्रकार संजयने एका मुलाखतीत सांगितला असून ही गोष्ट 1993 सालची असल्याचं देखील संजयने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे नोटांचा उडतोय रंग, ‘हे’ ठरतंय कारण!

तिनं नग्न व्हायला सांगितलं, ते नग्न झाले; पुण्यात 150 पेक्षा जास्त जणांसोबत धक्कादायक प्रकार

8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More