बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लायकीत राहा अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना चांगलंच फैलावर धरलं आहे. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी काल कोल्हापूरात पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी हा इशारा दिला आहे.

मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचं काही कारण नाही पण, मी त्यांना इशारा देतोय की, केंद्राकडून संरक्षण देऊन शिवसेनेवर बोलण्यापैक्षा तुझ्यात जर दम असेल तर असेल तर मुंबईत कुठेही सांग आणि माझ्यासोबत लढायला ये. तुला दाखवून देतो, शिवसेना काय आहे, असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी किरीट सोमय्या यांना दिला आहे.

केंद्राचं संरक्षण घेऊन फालतू बडबड करणं फार सोपं असतं म्हणून तू तुझ्या लायकीत रहा. पक्षाविषयी मातोश्रीविषयी काही बोलू नको. सत्ता आज असते, उद्या असते. उद्या जर केंद्रातली सत्ता गेली तर तुला फाॅरेनमध्ये पळून जावं लागलं, एवढं लक्षात ठेव, असंही राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,कोल्हापूरात पोहचताच सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीफ यांना तुरूंगात धाडणार असं सोमय्या म्हणाले आहेत. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरूवात झालीय, असं सोमय्या म्हणाले होते. त्यावर आता राजेश क्षीरसागर यांनी हल्लाबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल तर… – राहुल गांधी

“हे तर ओल्या दुष्काळाचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा”

“…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलं भारतीय संघाचा मेन्टाॅर”

“आम्ही शेतकरी गेलो सरणावर अन् माझ्या सरणावरची फुले मंत्र्यांच्या अंगावर”

“शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, रस्त्याच्याकडेला उभं राहून पाहणी करू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More