बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, म्हणाले…

मुंबई | कोरोना काळात अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावं लागलं आहे. सेलिब्रटी, राजकारणी असो वा सामान्य माणुस अनेकांनी आपल्या जवळची व्यक्ती या कोरोना काळात गमावली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं. राज ठाकरे यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं शक्य नाही. सध्याची परिस्थिती दुःखाची आहे. मात्र या काळातही खंबीर राहा, असं राज ठाकरेंनी पत्रात आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. पत्र लिहून त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं आहे, असं मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं आहे.

वाचा पत्र-

आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटलं. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.

परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा.

आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबिय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना, ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.

आपला नम्र,

राज ठाकरे

थोडक्यात बातम्या-

यास चक्रीवादळाचं कव्हरेज करताना महिला पत्रकार ढसा ढसा रडली, पाहा व्हिडीओ

शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; तरूणाला लोखंडी राॅडने मारहाण

मुलगी जवळ येताच गाढवानं केलं असं काही की ते पाहून तुम्हीही चकित व्हाल, पाहा व्हिडीओ

बायकोच्या मैत्रीणीच्या प्रेमात आकंठ बुडाला; त्यानंतर त्याने जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More